VIDEO | लंडनमधल्या नववर्ष स्वागत यात्रेत महाराष्ट्र मंडळाचे ढोल पथक 

VIDEO | लंडनमधल्या नववर्ष स्वागत यात्रेत महाराष्ट्र मंडळाचे ढोल पथक 

यंदा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 1 जानेवारी 2020 रोजी लंडनमध्ये भव्य यात्रा काढण्यात येणार आहे. या भव्य यात्रेमध्ये लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचे 'ढोल बीट युके'ढोलपथकही सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या यात्रेमध्ये 10 हजार जण सहभागी होणार असून ही यात्रा पाहण्यासाठी 5 लाख नागरिक रस्त्यावर उतरतील असा अंदाज आहे. 

लंडनमध्येही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतो आणि या उत्सवामध्ये आगमन आणि विसर्जन मिरवणूक ही ढोलपथकाच्या दणदणीत सादरीकरणानेच पार पडते. लंडनमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी होणारी मिरवणूक दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. 2019 ची नववर्ष स्वागत यात्रा ही ३ कोटी प्रेक्षकांनी टीव्हीवरून पाहिली होती. हा आकडा यंदा अधिक असेल असा अंदाज आहे.

या पथकात 3 ते 50 वयोगटातले 40 वादक सहभागी होतील.या यात्रेसाठी महाराष्ट्र मंडळाच्या पथकाची जबरदस्त तयारीही सुरू आहे.हे पथक मराठी, इंग्रजी, पंजाबी, आणि गुजराती गाणी वाजवणार असल्याचं समजतंय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com