शेती अवजारे बनविणारा लोहार व्यवसाय अडचणीत; कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा कसा करायचा? 

शेती अवजारे बनविणारा लोहार व्यवसाय अडचणीत; कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा कसा करायचा? 
lohar bussiness

उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शेती व्यवसाय केला जातो त्यात लोहार व्यवसाय शेती व्यवसायाशी निगडित व्यवसाय आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे बनविण्याचे काम लोहार व्यवसायिक करतात. मात्र शेती मशागतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापरामुळे अडचणीत आलेल्या लोहार व्यवसायावर कोरोना संकट व लॉकडाउनमुळे लोहार व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आला आहे.(Due To Coronavirus The blacksmith business is in trouble)

मागील वर्षीचा पावसाळी हंगाम लोहार व्यवसायिकांना साधता आला नव्हता तर याही वर्षी पावसाळी हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर लोकडाऊन सुरू असल्याने लोहार व्यवसायिकांचा मोठा तोटा होणार आहे.  लोहार समाजाची अनेक कुटुंबे वडिलोपार्जित लोहार व्यवसाय करतात. या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा संपुर्ण खर्च हा लोहार व्यवसायावर अवलंबुन आहे.

मात्र मागील वर्षापासुन कोरोनाच्या संकटाच्या आणि लॉकडाउनच्या टांगत्या तलवारीमुळे इतर व्यवसायंप्रमाणे लोहार व्यवसाय कधी चालू तर कधी बंद अशी परिस्थिती वर्षभर पाहायला मिळाली. कोरोना महामारीच्या संकटात अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.  त्यातच आता बारा बलुतेदारांच्या व्यवसायांनाही मोठा फटका बसल्याने मायबाप सरकारने वेळेच या व्यवसायांना हातभार लावण्याची गरज आहे. 

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com