या दुर्मिळ आजारमुळे, चिमुकलीला हवे तब्बल 16 कोटींचे इंजेक्शन

या दुर्मिळ आजारमुळे, चिमुकलीला हवे तब्बल 16 कोटींचे इंजेक्शन
injection

नागपूर -  नागपुरातील Nagpur  दुर्मिळ आजाराने Rare disease  ग्रस्त असलेल्या एका चिमुकलीला तब्बल 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन injection हवे आहे. नागपूरच्या गुरुदेव नगर भागात राहणारे होमिओपॅथी डॉ. पियुष Homeopathy Dr.Sorate सोरते यांची श्राव्य ही पावणे दोन वर्षांची मुलगी Girl  आहे. (Due to this rare disease, Chimukali needs an injection of Rs 16 crore)

तिला स्पायनल मस्कुलर एन्ट्रीपी हा दुर्मिळ असा आजार झाला आहे. या आजारात नर्व्हस सिस्टीम क्षीण होते. त्यामुळं श्राव्याच्या शरीराची हालचाल मंदावली आहे. श्राव्या जन्मानंतर नऊ-दहा महिन्यांपर्यंत इतर मुलांसारखीच होती. 

हे देखील पहा - 

परंतु, नंतर तिच्या शरीराची हालचाल मदावली आहे. त्या चिमूकलीला डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टरांनी हा दुर्मिळ आजार झाल्याचं सांगितलं आहे. 
यासाठी लागणारे इंजेक्शन फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. 

या  इंजेक्शनची किंमत 22 कोटी रुपये आहे. मात्र, सरकारनं एक्ससाईज ड्युटी माफ केल्यावर त्याची किंमत 16 कोटी रुपये होते. श्राव्याच्या कुटुंबीयांनी सरकार, समाजसेवी संस्था आणि नागरिकांना मदतीचं आवाहन केल आहे.

Edited by - Puja Bonkile  
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com