नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली 'ही' माहिती

नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली 'ही' माहिती
eknath shinde

मुंबई : नवी मुंबई Navi Mumbai विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने Cidko मंजूर केला आहे, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी दिली आहे. नवी मुंबई विमानतळाला Airport स्व. दि. बा. पाटील Dinkar Balu Patil यांचं नाव द्यावं या मागणीनं जोर धरला आहे. त्यावर आज एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. Eknath Shinde gave this information about the name of Navi Mumbai Airport

ते म्हणाले, "दि. बा. पाटील यांच्याबद्दला आम्हाला आदर आहे. याआधी दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत  सुचविले नव्हते.आता सिडकोने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानातळाला दि. बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी बदलापूर मधील घोरपडे चौकात मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.Eknath Shinde gave this information about the name of Navi Mumbai Airport

हे देखील पहा - 

यावेळी दोनशे हुन अधिक आंदोलक जमा झाले होते. स्थानिक आगरी कोळी बांधवानी ही मानवी साखळी तयार केली. बदलापुरातून जाणाऱ्या कर्जत महामार्गावरील कात्रप चौक ते शिरगाव आपटे वाडी चौका पर्यत ही मानवी साखळी तयार करण्यात केली हाती. या आंदोलनाला आजू बाजूच्या गावातील आगरी कोळी बांधव  सहभागी झाले होते .

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com