सोलापुरात प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आले इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
सोलापूर

सोलापुरात प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आले इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

सोलापूर : पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास थांबावा आणि डिझेल-पेट्रोल ला पर्याय म्हणून नागरिकांनी इलेक्ट्रिक Electric वाहनांचा Vehicles वापर करावा यासाठी सोलापूर महापालिकेकडून Muncipal Corporation शहरात प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्यात आले आहेत. An electric charging station was set up on an experimental basis at Solapur

'माझी वसुंधरा' आणि राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अभियानांतर्गत हे चार्जिंग Charging स्टेशन Station सुरु करण्यात आले आहे. सोलापूर शहरात दोन ठिकाणी हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, सोलापूरकरांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे. 

सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम आणि आयुक्त पी.शिवशंकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. राज्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल Petrol आणि डिझेलचे Diesel भाव पाहता भविष्याच्या दृष्टीने सोलापूर महापालिकेने टाकलेलं हे एक सकारात्मक पाऊल आहे. 

येणाऱ्या काळात या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्याचा सोलापूर महापालिकेचा विचार आहे. An electric charging station was set up on an experimental basis at Solapur

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com