११ वर्षांच्या मुलाने करुन घेतली अपहरणकर्त्यापासून सुटका 

११ वर्षांच्या मुलाने करुन घेतली अपहरणकर्त्यापासून सुटका 
Nanded Kidnapping Accused Mahesh Boinwad with his car

नांदेड : नांदेड Nanded जिल्ह्यातील देगलूर येथील ११ वर्षांच्या मुलाचं अपहरण Kidnapping झालं होतं. मात्र, या मुलानं तब्बल दहा तासानंतर अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतः सुटका करुन घेतली आहे. ओमकार पाटील असं अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या मुलाचं नाव आहे. Eleven Year Boy Foiled attempt of Kidnapping in Nanded District

काल दुपारीच कुटुंबाच्या ओळखीच्या असलेल्या महेश बोईनवाड याने वाढदिवसाला मिनी कार गिफ्ट देतो असे सांगून इर्टीगा कारमधून ओमकारचे अपहरण केले. रात्री बिलोली तालुक्यातील बडुर येथे कारमधील डिझेल संपले. त्यामुले आपले पितळ उघडे पडेल, या भितीने बोईनवाडने ओमकारच्या डोक्यात दगड घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ओमकारने प्रतिकार करत पळ काढला आणि जवळच एका शेतकऱ्याकडून मोबाईल मागून कुटुंबीयांना फोन केला.

दरम्यान, अपहरणकर्ता बोईनवाड तेथून फरार झाला. देगलूर पोलिस Police ठाण्यात आरोपी बोईनवाडच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईनवाडने कोणत्या कारणासाठी ओमकारचं अपहरण केलं होतं याचा पोलिस शोध घेत असून, आरोपी बोईनवाड च्या शोधात दोन पोलिस पथकं रवाना झाली आहेत.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com