शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने शिवसेनेतर्फे करण्यात आला रस्ता रोको

शहरामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने शिवसेनेतर्फे करण्यात आला रस्ता रोको
ShivSena blocked the road from Savarkar statue to oval garden

धुळे -  धुळे शहरामध्ये Dhule city महानगरपालिकेच्या अंतर्गत Under the Corporation येणाऱ्या रस्त्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवस्था खराब झाली आहे. यामुळे बहुतांश वाहन धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. As the empire of potholes grew in the city, the Shiv Sena blocked the road

हे देखील पहा - 

त्याचबरोबर रस्त्यामध्ये वाढलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वाहन धारकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अनेकांना दुखापत देखील सहन करावी लागत आहे. 

सावरकर पुतळापासून अंडाकृती बगीचापर्यंत रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेलं आहे. याविरोधात या ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यात वाहने आडवे टाकून रास्ता रोको केला आहे. 

जोपर्यंत पालिका प्रशासनातर्फे ठोस आश्वासन देऊन कामाची हमी घेतली जात नाही, तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवणार आहे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. या रास्ता रोको दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com