धूळे: पुलगाव आणि देवळीत ऑक्सिजन व्यवस्थेसह कोविड सेंटर स्थापन
mla

धूळे: पुलगाव आणि देवळीत ऑक्सिजन व्यवस्थेसह कोविड सेंटर स्थापन

देवळी आणि पुलगाव या दोन शहरातील लोकसंख्या आणि रुग्णसंख्या पाहता अतिरिक्त बेडची गरज असणार आहे. नागरिकांची मागणी आणि आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी देवळी परिसरात ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. आरोग्य सुविधा कमी पडू नये, याकरिता वर्ध्याच्या देवळी, पुलगाव येथे कोविड केअर सेंटरला सुविधा वाढविण्यात आल्या. आमदार रणजित कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.(Establishment of covid Center with Oxygen System at Pulgaon and Deoli)

देवळी आणि पुलगाव इथल्या वसतिगृहात हे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रांत 100 बेडची सुविधा असून सध्या प्रत्येकी 40 ऑक्सिजन बेड उपलब्ध केले आहेत.  येथे डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, कोविड प्रोटोकॉलनुसार औषधेे उपलब्ध केली आहेत. देवळीच्या संगम ओ टू प्लांटकडून ऑक्सिजन दिलं जाणार आहे.

हे देखील पाहा

आमदार कांबळे यांच्या आमदार निधीतूनही याकरिता खर्च केला आहे. आमदार कांबळे आणि मित्र परिवाराकडून रुग्णांना फळ, चहा, नास्ता दिला जाणार आहे. एवढंच नव्हे तर पुलगाव येथील सेंटरला दोन आणि देवळी येथील सेंटरला एक रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड सेंटरमध्ये नागरिक  सुविधांचा अभाव असल्यानं जाणे टाळत होते. मात्र आमदार कांबळे यांनी कोविड सेंटर उभारत त्यात नागरिकांसाठी  सर्व सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे आता ग्रामीण भागासह शहरी नागरिकांना उपचारासाठी मदत होणार आहे.

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com