माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; दररोज 400 जणांना वाटले अन्नाचे पॅकेट्स

माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; दररोज 400 जणांना वाटले अन्नाचे पॅकेट्स
Every day 400 people felt packets of food


सोलापूर - कोरोना रुग्ण Corona patient आणि त्यांच्या नातेवाईकांना Relatives अन्न पुरवण्यासाठी सोलापुरातील तरुणांनी हा Solapur youth उपक्रम सुरू केला आहे. तसे हे तरुण मुळचे सोलापूरचे मात्र नौकरी, व्यवसायानिमित्त देशविदेशात स्थायिक झालेले हे तरुण सढळ हातानं मदत करत आहेत.  Every day 400 people felt packets of food

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना याप्रकारे अन्नाची पाकीट वाटली जात आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण सोलापुरात येतात. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची अडचण निर्माण होते. त्यांना जेवण मिळवण्यात अनेकदा अडचणी येतात. कधी कधी पैशांची सुद्धा नसतात. त्यामुळेच त्यांची अडचण लक्षात घेऊन कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नाची पाकीट पुरवली जात आहेत.

हे देखील पहा -  

यासाठी 'हरिभाई देवकर' शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. 1991 च्या दहावीच्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी पैसे गोळा केले. 1991 च्या बॅचचे अनेक विद्यार्थी मुंबई,पुणे,बँगलोर आणि थेट अमेरिकेत सुद्धा वास्तव्याला आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे रोज 400 कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण दिले जात आहे अशी माहिती माजी विद्यार्थी अमोल भूसेकर यांनी दिली आहे.  

माजी विद्यार्थ्यांना सोलापूरसाठी काही तरी करायच होते. परंतु सोलापूरपासून दूर असल्यामुळे त्यांना प्रत्यक्षात काही करता येत नव्हते. अशातच निराधार महिलांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम सुरु केले. 
दररोज शहरातील 11 रुग्णालयात अन्नाची पाकीट नियमित पाठवली जातात.

सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णसुद्धा इथे उपचारासाठी येत असतात, या सर्व गरजूंना माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचा मोठा फायदा होत आहे. यामुळे कोरोना रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रश्न सुटलाय.

अनेकदा तरुणाईला सामाजिक भान नाही असे बोल्या जाते. मात्र या तरुणाईने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. आपल्या शहरापासून दूर असलेल्या तरुणांनी भरीव काम केल आहे. रुग्णांना सुखाचे दोन घास मिळावेत यासाठी या सगळ्यांनी केलेल्या कामाचं मोठं कौतुक सर्वत्र होत  आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com