प्रसिद्ध "बाबा का ढाबा" अखेर शांत...

प्रसिद्ध "बाबा का ढाबा" अखेर शांत...
The famous Baba Ka Dhaba finally calmed down   

नवी दिल्ली : कोणाचे नशीब केव्हा पलटेल, सध्या काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी दिल्लीतील मालवीय नगर भागातील बाबा का ढाबा Baba Ka Dhaba चालवणाऱ्या ८१ वर्षाचे कांता प्रसाद आणि पत्नी बादामी देवी या दोघांचे नशीब एका व्हायरल Viral व्हिडिओमुळे Video संपूर्ण पलटूनच गेले होते. ट्विटरवर Twit  ते टॉप ट्रेंडमध्ये चाले होते. इतकेच नाही तर, त्यांच्या ढाब्याबाहेर लोकांनी अक्षरशः लाईन लावण्यास सुरुवात झाली होती. The famous Baba Ka Dhaba finally calmed down 

अनेकांनी त्यांना आर्थिक मदत देखील केली होती. यामधून कांता प्रसाद यांनी रेस्टॉरंट Restaurant सुरू केले होते. मात्र, आता हे रेस्टॉरंट त्यांना बंद करावं लागलं आहे. जुन्या ढाब्याकडेच परत त्यांना जावं लागलं आहे. बाबा का ढाबा पुन्हा एकदा ग्राहकांची रांग लागण्याची वाट बघत आहे. कांता प्रसाद म्हणाले, की दिल्लीत मध्ये लॉकडाऊन असल्याने १७ दिवसांसाठी जुना ढाबा बंद कराव लागल आहे. 

याचा मोठा परिणाम विक्रीवर झाला आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा त्यांना गरीबीचा सामना करावा लागला आहे. त्यांनी सांगितले, की लॉकडाऊनमुळे Lockdown दैनंदिन कमाई ही ३५०० रुपयांवरुन चक्क १००० रुपयांवर आली आहे. यामध्ये कुटुंबाचे खर्च भागवण्यासाठी पुरेसं नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचे रेस्टॉरंट फेब्रुवारी महिन्यापासून बंद करण्यात आले. The famous Baba Ka Dhaba finally calmed down

आता ते पुन्हा आपल्या  ढाब्याकडे परतले आहेत. मात्र, आता आधीसारखी कमाई होत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इथूनच त्यांच्या कमाईत मध्ये  दहा पट वाढ झाली होती. बाबा इंटरनेटवर जास्त फेमस Famous सुद्धा झाले होते. मागील वर्षी बाबा का धाब्याच्या व्हिडिओमुळे व्हायरल झालेले बाबा कांता प्रसाद यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. यातून त्यांनी नवे रेस्टॉरंट सुरू केलं होत.

हे देखील पहा 

आपल्या घराचं काम केल व जुने कर्जही त्यामध्ये फेडलं. स्वतःसाठी व मुलांसाठी स्मार्टफोन Mobile देखील विकत घेतले. मात्र, आता पुन्हा त्यांचे वाईट दिवस चालू झाले आहेत. त्यांच्या ढाब्यावर सध्या भात, डाळ व  दोन प्रकारच्या भाज्या मिळत आहेत. यू-ट्यूबर Youtube गौरव वासन याच्यामार्फत बाबा का ढाबा लोकप्रिय झाले होते. वासननं ढाब्याच्या व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले होते. मात्र, काही काळानंतर कांता प्रसाद यांनी वासन आणि त्याच्या सहकार्यांवर दान म्हणून मिळालेल्या पैशाचा दुरुपयोग केले. फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. आरोप सुद्धा केले, की वासनने स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा आणि मित्रांचे बँक Bank अकाऊंट शेअर केले होते आणि मिळालेल्या आर्थिक मदतीत गडबड देखील केली होती.

Edited By- Digambar Jadhav
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com