सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याची ३०० किलोमीटर पायी वारी !

सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याची ३०० किलोमीटर पायी वारी !
A fan walks 300 km to meet Sonu Sood

सोलापूर: अभिनेता सोनू सूद Sonu Sood याने लॉकडाउनच्या  Lockdown काळात अनेकांची मदत केली. त्याच्या या मदतीमुळे Help अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीसाठी, आभार व्यक्त करण्यासाठी जमा होत असतात. मात्र सोनू सूदचा असा एक चाहता आहे जो सोनूला भेटण्यासाठी हैदराबादवरून Hydrabad चक्क पायी निघाला आहे. A fan walks 300 km to meet Sonu Sood

मूळचा तेलंगणा Telangana मधील दोरनापल्ली या गावातील रहिवासी असलेला व्यंकटेश हरिजन हा युवक चालत मुंबईला निघाला आहे. १ जून पासून तो दररोज सरासरी ४० किलोमीटर चालत आहे. आज तब्बल ३०० किलोमीटर चालत तो सोलापुरात पोहोचला. अभिनेता सोनू सूद हा देवप्रमाणे प्रत्येकाची मदत करत आहे.

'देवाच्या दर्शनासाठी पायीच जायचं असतं. त्यामुळे पायी निघालोय' अशी भावना व्यंकटेश याने व्यक्त केली. हे पाहून अभिनेता सोनू सूद याने त्याला स्वतः फोनकरून त्याला वाहनाने मुंबईला येण्यास सांगितले. मात्र व्यंकटेश काही करता ऐकायला तयार नव्हता.

हे देखील पहा -

शेवटी सोनू सूद फाउंडेशनचे कार्यकर्ते विपुल मिरजकर यांनी सोन सूद यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करून व्यंकटेश याच्याशी बोलणं करून दिलं. त्यावेळी व्यंकटेश गाडी द्वारे मुंबईला जाण्यासाठी तयार झाला. 

दरम्यान आपल्या सर्वांचे प्रेम माझ्यावर आहे. अशा पद्धतीने चालत येणे हे धोकादायक आहे. त्यामुळे असा प्रयत्न कोणीही करू नये अशी विनंती अभिनेता सोनू सूद याने केली आहे. 

Edited By-Sanika Gade
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com