पैसे काढण्यासाठी अडीच तास रांगेत उभे राहिल्याने ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

पैसे काढण्यासाठी अडीच तास रांगेत उभे राहिल्याने ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
farmer parbhani

परभणी : जिंतूरच्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रांगेत Line तब्बल अडीच तास उभे राहून पैसे काढणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू Death झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे. Farmer died after standing in line for two and a half hours to withdraw money

सुदाम कांबळे असे मृत्यू पावलेल्या या वृद्धाचे नाव आहे. ते बैंकेतून Bank पैसे काढल्या नंतर घरी जात असताना त्यांना चक्कर आली आणि त्यांच्या जागीच मृत्यू झाला. बैंकेच्या ढिसाळ, आणि निष्क्रिय कार्यप्रणालीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप  कुटुंबीयांनी केला आहे. 

हे देखील पहा -

तालुक्यातील परभणी मध्यवर्ती बँकेच्या सर्वच शाखेत शेतकरी Farmer वर्ग मोठ्या संख्येने खातेदार आहेत. बॅंकेच्या ढिसाळ कारभार आणि नियोजन शून्य व्यवहाराबाबतीत खातेदारांकडून अनेक वेळा तक्रारी येत असतात.

जिल्ह्यात कोविड-१९ Covid चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी बँक व्यस्थापनाकडून म्हणावे तसे नियोजन असल्याचे दिसत नाही. खातेदारांना पैसे काढण्यासाठी नेहमीच वेठीस धरून ठेवत असल्याने बॅंक व्यवस्थापना वर रोष व्यक्त केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com