राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज 

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज 
Saam Banner Template (51).jpg

मुंबई- राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने State Government मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी interest free loansउपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने Cabinet १० जुन रोजी मान्यता दिली. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकणार आहे.  Farmers in the state will get interest free loans

मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अनोखी भेट ठरली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारचा हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती दिली. यापूर्वी शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज उपल्बध करुन देण्यात येत होतं. मात्र, आता ही मर्यादा वाढवली आहे. आता 3 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Farmers in the state will get interest free loans

हे देखील पहा -

हे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

- राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन प्रवाळ  संवर्धन, उपजीविकेलाही प्रोत्साहन, ग्रीन क्लायमेट फंडाचे सहाय्य.

- नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय.

- तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज, दोन टक्के व्याज दर सवलत दिल्याने लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार.

 - दुय्यम न्यायालय आणि  मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमणार.

- शहरांमध्ये प्राचीन अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार , हेरिटेज ट्री संकल्पना.

- महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com