शेततळे ठरले मृत्यूचे जाळे; बाप-लेकासह भाच्याच्या बुडून मृत्यू

शेततळे ठरले मृत्यूचे जाळे; बाप-लेकासह भाच्याच्या बुडून मृत्यू
GEVRAI

बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या दैठणा गावात, शेततळ्यात बूडुन बाप-लेकासह भाच्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी घडली आहे. सुनिल जग्गनाथ पंडित वय 40,  त्यांचा मुलगा राज पंडित वय 12 व सुनील पंडित यांचा भाच्चा शेततळ्यावर गेले होते. यावेळी सुनील पंडित यांचा मुलगा राज व त्यांचा भाचा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले होते. यावेळी ते दोघे पाण्यात बुडू लागले. हे पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी मारून, त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. दरम्यान गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण दैठणा गावावर शोककळा पसरली आहे.(Father and son drown in pond)

हे देखील पाहा

दरम्यान, सांगलीच्या तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के वय-6 वर्षे राहणार आरवडे आणि ऐश्वर्या आप्पासो आवटी वय-8 वर्षे राहणार माधवनगर या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. ही घटना ताजी असताना गेवराईमधील ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com