धक्कादायक! महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार करून मारहाण

धक्कादायक! महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार करून मारहाण
police

वाशीम: स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर बलात्कार करून मारहाण केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे  नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असून, त्यांच्यावर 376 सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून,पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांत एकचं खळबळ उडाली आहे. 

वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात 2007 मध्ये विश्वकांत गुट्टे पीएसआय या पदावर कार्यरत असतांना सदर महिला पोलीस कर्मचारयांची ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत  दोन दिवसांपूर्वी वाशिममध्ये आरोपी घरी आला असता त्यांनी जबरदस्ती करीत बलात्कार केला आहे.(Female police officer raped and beaten)

हे देखील पाहा

त्याप्रकरणी काल रात्री महिला पोलीस कर्मचारी यांनी  वाशिम शहर पोलिसांत 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करीत असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितलं आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com