मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार - विनायक मेटे

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार - विनायक मेटे
Saam Banner Template (41).jpg

 बीड -  मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation येणाऱ्या 5 तारखेला कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये Beed मोर्चा निघणार आहे. या सरकारला Government सळो की पळो करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.जोपर्यंत मराठा समाजाला सर्व समाविष्ट आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा राज्यभर सुरु ठेवणार आहोत. The fight will continue till the Maratha community gets reservation

पोलिसांनी 5 तारखेच्या मोर्चाला सहकार्य करावं. ज्या ठिकाणी पोलीस मोर्चा अडवतील त्याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा आमदार विनायक मेटे Vinyak Mete यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे. तर आरक्षण न मिळाल्यास बीड मधील मोर्चाची ठिणगी राज्यभर वणवा पेटवेल.असा इशारा देखील इशारा मेटे यांनी सरकारला दिला आहे. 

हे देखील पहा -

तर माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मोर्चामध्ये मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहे. अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, नरेंद्र पाटील Narendra Patil  यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.दरम्यान मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, बीडमधील हा मोर्चा राज्यातील पहिला मोर्चा असल्याने, याकडं सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By - Shivani Tichkule
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com