Mulshi Fire: कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

Mulshi Fire: कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 
mulshi fire

काल मुळशी तालुक्यातील उरवणे येथील केमिकल कंपनीला आग लागली होती. या आगीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी कंपनी मालक आणि व्यवस्थापनावर टीका करू लागले. त्यानंतर काल रात्री पुण्याचे पालक मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोषींवर कारवाई होईल असे सांगण्यात आले होते. त्यांनतर आज एसव्हीएस या कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामिण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संपुर्ण घटनेची प्राथमिक चौकशी केली असून प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करत आहेत. (Filed a case against the owner of the original company)

हे देखील पाहा

दरम्यान “पुण्याच्या मुळशी (Mulshi Fire Incident) तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी आणि बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काळ केली होती. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यांच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली होती. 

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com