पेरणी पूर्व मशागत अंतिम टप्प्यात; आता वाट मान्सूनची

पेरणी पूर्व मशागत अंतिम टप्प्यात; आता वाट मान्सूनची
CULTIVATE

अकोला जिल्ह्यात (Akola District) खरीप हंगामातील मशागती अंतिम टप्प्यात असून आता शेतकरी (Farmer) मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहेत. जिल्ह्यात काल आलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे खरीप हंगामासाठी हा पाऊस पोषक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेरणी पूर्व नियोजन पूर्ण झाले आहे. तर जिल्ह्यात यंदाच्या हंगामात 4 लाख 71 हजार हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 50 टक्के क्षेत्रावर अपेक्षेप्रमाणे सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला.(In the final stage of cultivation)

त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. यंदा सोयाबीन 2 लाख 9 हजार 100 हेक्टर तर कापूस 1 लाख 47 हजार हेक्टर, तूर 51 हजार 200 हेक्टर, मूग-35 हजार 150 हेक्टर, उडीद 16 हजार 125 हेक्टर, ज्वारी 8700 हेक्टर, मका 285 हेक्टर, अशा प्रकारे पीक लागवड होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकासाठी एक लाख 56 हजार 825 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 32 हजार 299 क्विंटल बियाण्याची मागणी आहे.

खतसाठा मुबलक असल्याची माहिती
लागवड क्षेत्र व पीक पद्धतीचा विचार करीत खतांचे नियोजन करण्यात आले. यानुसार जिल्ह्यात 95 हजार 700 मेट्रीक टन खतांची मागणी असून, जिल्ह्याला 77 हजार 990 मेट्रीक टन आवंटन मंजूर आहे. मागील वर्षाचे 28 हजार 696 मेट्रीक टन खत शिल्लक असून आणखी खतसाठा मंजूर करण्यात आला आहे.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com