अखेर उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द

अखेर उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द
ujni

पंढरपूर - उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केलेले 5 टीएमसी पाण्याचा आदेश आज रद्द करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजीनाथ चिल्ले यांनी हा निर्णय रद्द केला आहे.

उजनीतून इंदापूरला  Indapur पाणी वळवण्यास सोलापूर Solapur जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. विविध शेतकरी संघटनांनी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन ही केले होते. काल शरद पवार Sharad Pawar यांच्या गोविंद बागेत आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. Finally the decision to supply water to Indapur from Ujjani  was canceled

हे देखील पहा -

तर लापूर जिल्ह्यातील उजनी पाणी प्रश्न घेऊन शेतकरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांच्या दारात बसले होते. उजनी धरणातुन बारामती आणि इंदूपुर जिल्ह्याला पाणी देण्यास विरोध करत उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते इस्लामपूर याठिकाणी मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर  बोंबा बोंब आंदोलन करणार होते. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना कारखान्यावर थांबवून ठेवले.

पोलिसांनी मज्जाव केल्याने यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तर याची दखल घेत पाटील यांनी त्वरित हा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सुरू असलेले हे आंदोलन स्थगित करण्यात आले. Finally the decision to supply water to Indapur from Ujjani was canceled

दरम्यान आज जलसंपदा विभागाने उजनी धरणातून इंदापूरला मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी रद्द करत असल्याचे  लेखी आदेश काढला आहे. त्यामुळे गेल्या महिना भररापासून सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्ण विराम मिळाला आहे.या निर्णयाचे आंदोलक व शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

Edited By - Shivani Tichkule


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com