Big Breaking विरारच्या रुग्णालयात अग्नीतांडव; १३ रुग्णांचा मृत्यू

Big Breaking विरारच्या रुग्णालयात अग्नीतांडव; १३ रुग्णांचा मृत्यू
Fire in virar hospital

विरार : नाशिकमध्ये Nashik आॅक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पहाटे विरार Virar येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागाला आग Fire लागून त्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Fire Broke out at virar Hospital Thirteen Patients died

विरार पश्चिम येथे हे कोविड Covid 19 रुग्णालय आहे. त्यात पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. त्यात एकूण 17 रुग्ण अडकले होते. अग्निशमन दल Fire Brigage आणि पोलिसांनी Police आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरवात केली. 

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात अचानक रात्री 3 च्या सुमारास ही लागली. ही आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्ण दगावले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या अग्निशमन विभागाने आग विझवली असून रुग्णांना हलविण्याचा काम सुरू आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com