गोव्यात उद्यापासून पाच दिवसांचा लाॅकडाऊन

गोव्यात उद्यापासून पाच दिवसांचा लाॅकडाऊन
Five Days Lock Down in Goa from Tomorrow

पणजी : गोव्यातले GOA वाढणारे कोरोना बाधित रुग्ण आणि वाढणारा मृत्यू दर लक्षात घेऊन अखेर गोवा सरकारने सरकारी यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी पाच दिवसाचा लॉकडाउन Lock Down जाहीर केला आहे.

उद्या (ता. २९) रात्री दहा वाजल्यापासून हा लॉक डाऊन ३ मे May पर्यंत चालणार आहे. प्रामुख्यानं हॉटेल्स पब कॅसिनो Pub Casino संपूर्णता बंद राहणार असून अत्यावश्यक सेवाना मात्र या लॉक डॉउन मधून वगळण्यात आले आहे. रुग्णांना लक्षणे दिसतात सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून Health Centers कोरना संबंधित किट घेऊन उपचार सुरू करावेत, असे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत Dr. Pramod Sawant यांनी जाहीर केले आहे. 

गोव्यात आत्तापर्यंत कोरोना चे ८१ हजार ९०८ रुग्ण सापडले असून त्यापैकी ६४ हजार २३१ रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत. मात्र गेल्या २४ तासात २ हजार ११० रुग्ण नव्याने सापडले असून ३१ रुग्णांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. त्यामुळे बळींची संख्या १ हजार ०८६ झाली असून १६ हजार ५९१ रुग्ण ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com