रेमडेसीवीरचा काळाबाजार - पाच सदस्यीय समिति करणार चौकशी

रेमडेसीवीरचा काळाबाजार - पाच सदस्यीय समिति करणार चौकशी
Amravati Collector Shailesh Naval

अमरावती : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील तथ्य बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. सदर समिती यातील तथ्य बाहेर काढणार आहे.रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणाचा गुन्हेशाखेने बुधवारी पर्दाफाश केला होता. Five Members Committee Constituted in Amravati to probe Remdisivir Black Marketing

पोलिसांनी डॉ.पवन मालसुरे व अक्षय राठोड यांच्यासह सहा आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात पोलिसांनी पीडीएमसीच्या एका कर्मचाऱ्यास अटक करून त्याच्याजवळून २ इंजेक्शन जप्त केले. यातील डॉ. पवन मालसुरे तिवसा येथील शासकीय रुग्णालयात, तर डॉ. अक्षय राठोड भातकुली येथील प्राथमिक आरोग्य जिल्ह केंद्रात कार्यरत आहेत.

हे देखिल पहा- 

कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून असताना रुग्णांवर उपचारासाठी अत्यावश्यक रेमडेसिवीरचा काळाबाजार उघडकीस आल्याने आरोग्ययंत्रणेवर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील तथ्य बाहेर काढण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. Five Members Committee Constituted in Amravati to probe Remdisivir Black Marketing

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरातील अनियमितता, ती कशी झाली व कशी रोखता येईल, यासाठी समिती चौकशी करणार आहेत. समितीमध्ये उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अनिरूद्ध देशमुख,औषधी निरीक्षक अन्न व प्रशासन मनीष गोतमारे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोड यांचा यात समावेश आहे.

सात दिवसांचा अवधी

रेमडेसिवीर प्रकरणातील तथ्य बाहेर काढण्यासाठी गठित पाच सदस्यीय समितीला सात दिवसांचा अवधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सदर समिती सात दिवसांत याप्रकरणाची चौकशी करणार असून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com