माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन 
kakde news

माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन 

पुणे : पुणे Pune जिल्ह्यातील शरद पवार Sharad Pawar यांचे राजकारणातील कट्टर विरोधक आणि कार्यकर्त्यांचे `लाला` माजी खासदार संभाजीराव काकडे Sambhajirao Kakade यांचे आज पुण्यातील राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले आहे. ते नव्वद वर्षांचे होते. Former MP Sambhajirao Kakade dies of old age at his residence

सिंडीकेट कॉंग्रेस Syndicate Congress, जनता पक्ष Janata Party आणि त्यानंतर जनता दल Janata Dal असा राजकीय प्रवास केलेल्या संभाजीराव काकडे यांनी पहिली निवडणूक सन १९७१ मध्ये लढवली.

हे देखील पहा -

यावेळी यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांनी प्रचंड प्रयत्न करूनही त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून निवडणूक जिंकली. त्यानंतर सन १९७८ व १९८२ या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकली. ते दोन वेळा खासदार बनले.

माजी पंतप्रधान विश्वनाथप्रतापसिंह Vishwanath Pratap Singh यांच्याशी असलेल्या जवळिकीने त्यांना जनता दलात प्रवेश करावा लागला. त्यांनी दिर्घकाळ जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक राजकीय नेते त्यांनी घडवले. तळागाळातल्या कार्यकर्त्याला ताकद देऊन त्याचे राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या संभाजीराव काकडेंचे राज्यभऱातील राजकीय वर्तुळात स्नेहसंबंध होते. 

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com