चाळीस रुपये किलो वांग्याची चाळीस लाखांच्या मोटारीतून विक्री...

चाळीस रुपये किलो वांग्याची चाळीस लाखांच्या मोटारीतून विक्री...
bringle vikri

सांगली : चाळीस रुपये किलो Kg, वांग्याची Eggplant विक्री चाळीस लाखांच्या विलायती मोटारीतून करण्याची वेळ सांगलीच्या Sangli तासगाव तालुक्यातील, एका राजकीय कार्यकर्त्यावर आली आहे. कोरोनामुळे बाहेर जाता येईना आणि बाजारावर Market नियंत्रण असल्याने शहरी ग्राहक समोर ठेवून उत्पादित केलेल्या या सेंद्रिय वांग्याची विक्री करण्यासाठी या शेतकऱ्यावर थेट स्वत:ची मोटार बाहेर काढण्याची वेळ आली आहे. Forty rupees a kilo of eggplant sold in a car worth forty lakhs in Tasgaon

तासगाव Tasgaon तालुक्यातील जिल्हा बँकेचे Bank संचालक डॉ. प्रताप पाटील Dr. Pratap Patil यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये सेंद्रिय वांग्याची लागवड  केली आहेत. सेंद्रिय वांग्याला आरोग्याच्या दृष्टीने जागृत असलेल्या शहरी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि २ रुपये जादा मोजले जातील, असा त्यांचा अंदाज होता. मात्र कोरोनामुळे Corona भाजीपाल्याच्या बाजारावरच नियंत्रण आले आहे.

यामुळे दूरच्या शहरात नेऊन शेतमालाचे विक्री करत ४ पैसे मिळवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. दुसरीकडे अन्य वांग्यांच्या तुलनेत या सेंद्रिय महाग असलेल्या वांग्यास स्थानिक पातळीवर ग्राहकही मिळेनासे झाले आहे. हा सारा विचार करत डॉ. पाटील यांनी थेट स्वत:ची मोटार बाहेर काढून, त्यातून तालुक्याच्या गावी नेले आणि या सेंद्रिय वांग्याची विक्री सुरू केली आहे. Forty rupees a kilo of eggplant sold in a car worth forty lakhs in Tasgaon

यानुसार ते रोज त्यांची चाळीस लाखांची मोटार बाहेर काढत त्यात ही वांगी तासगावात आणून त्याची विक्री करत आहेत. त्यांच्या या वांग्याला सध्या चाळीस रुपये किलो असा दर मिळत आहे. मात्र, यातून, चाळीस रुपये किलो वांग्याची चाळीस लाखांच्या मोटारीतून विक्री, अशी गमतीने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com