यवतमाळमध्ये 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू

यवतमाळमध्ये 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू
yavatmal

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे ढगफुटी सदृश्य पाऊस आला आणि अशातच पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे एका 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. Fourteen Year Old Girl Died By Lightning In Yavatmal

समीक्षा पिंटू जाधव असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पालकांसोबत ती मशागतीचे काम करत होती. शेतामध्ये काम करीत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

सोबतच विजेचा कडकडाट देखील होऊ लागला होता. अशावेळी समीक्षा तिच्या आई-वडिलांसोबत कापूस पिकाच्या लागवड करण्यासाठी मदत करत होती. दरम्यानच्या वेळेला अचानक तिच्या अंगावर वीज कोसळून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत समीक्षाच्या आईवडिलांनी आरडाओरड केली असता शेत शिवारातील इतर शेतकरी जमा झाले. या बाबतची सूचना प्रशासनाला देण्यात आली . पुसद तालुक्यात वीज पडून मृत्यू पडल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा -

पुसदचे तहसीलदार अशोक गिते यांनी पंचनामा करून पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.Fourteen Year Old Girl Died By Lightning In Yavatmal

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com