सोन्याची नकली नाणी देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सोन्याची नकली नाणी देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
lutmar

बुलढाणा -  सोन्याची Gold नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना customer मारहाण करणाऱ्या एका टोळीचा बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी Ploice पर्दाफाश exposed केला. १५ लाखाच्या फसवणूक Cheating प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर आज पहाटे खामगाव Khamgaon उपविभागीय पोलीस पथकाने अंत्रज गावाजवळील वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन राबविले. यात दोन देशी कट्ट्यांसह, शस्त्रात्र आणि नकली सोन्याची नाणी Gold Coin असे 31 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Fraud gang of gold counterfeiters exposed

खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली. या संघटीत टोळीद्वारे राज्यातील अनेकांना गंडविण्यात आले. कमी किंमतीत नकली सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचा. सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अंत्रज शिवारात बोलवायचे ग्राहकाकडून रक्कम आणि ऐवज लुटायचा अशी प्रॅक्टीस असलेल्या टोळीने ५ मे रोजी पुणे येथील एका व्यापार्याची फसवणूक करून मारहाण केली व पंधरा लाख रुपये घेऊन पोबारा केला. 

हे देखील पहा -

याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी खामगाव उपविभागीय पोलिस अधिकार क्षेत्रातील पोलीस निरिक्षक, सहा. निरिक्षक, पोलीस नाईक आणि पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटे चिखली रोडवरील अंत्रज येथे कोंबींग ऑपरेशन राबविले. या धडक कारवाईत टोळीतील 25  जणांना अटक करण्यात आली. Fraud gang of gold counterfeiters exposed

यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे, सोन्या चांदीचे दागिने नकली सोन्याच्या गिन्या रोख रक्कम 26 लाख रुपये, 26 मोबाईल, तलवार, सुरे  भाले, कुऱ्हाड असा मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकारच्या अनेक गुन्ह्याचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com