राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत वाटप
Free distribution of 1053 flowers in Dombivali on the occasion of Raj Thackeray's birthday

डोंबिवली -  मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे नेते तथा आमदार राजु  पाटील यांच्या मार्गदर्शनाने मनसे डोंबिवली शहराच्यावतीने डोंबिवली नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. 53 वा वाढदिवस असल्याने 1053 फुलझाडांचे वाटप केले आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली आहे. Free distribution of 1053 flowers in Dombivali on the occasion of Raj Thackeray's birthday


गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भरलेले, टवटवीत, सुगंधी आणि  रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब, मोगरा, जास्वंद अशी मनमोहक फुलझाडे वाटुन लोकांच्या जीवनात या दिवसानिमित्ताने चैतन्य जागृत होऊन नैराश्य व मरगळ दूर व्हावी.  

तसेच या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा हा सामाजिक संदेश घरोघरी जावा असा हेतू ठेवून सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी माहिती दिली आहे . डोंबिवली नागरीकांनी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी केवळ एका तासात तब्बल1053  रोपांचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी मनसे शहर संघटक योगेश रोहिदास पाटील यांनी विशेष सहकार्य केले आहे. 

हे देखील पहा - 


तसेच शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे. यामध्ये मानपाडा पोलीस ठाणे आणि विष्णु नगर पोलीस ठाणे येथे व्हीटॅमीन सी, प्रोटीन पावडर, मास्क, हँन्ड सनिटायझर वाटप केले आहे. याचे आयोजन शहर सचिव अरुण रामचंद्र जांभळे आणि माजी उपविभाग अध्यक्ष संदिप (रमा) भास्कर म्हात्रे यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेना यांच्या माध्यमातून वृद्धाश्रमाला  एका महीन्यांचे रेशन, आनाथश्रमांना शालेय साहीत्य, भाजी आणि फळ वाटप, N95 मास्क वाटप, जेष्ट नागरीकांना छत्री वाटप करण्यात आले आहे. 

आयोजक विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे आणि विद्यार्थी सेना यांनी केली आहे . गरजु रुग्णांना नाहर हॉस्पिटल डोंबिवली पुर्व येथे 14 जुन ते 21 जुन 2021पर्यंत बेड चार्जसाठी फक्त 53 रुपयांचा खर्च आहे. तसेच ज्यामधे डॉक्टर, नर्सिंग, खाट भाडे आणि जेवण या गोष्टींचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष दिनेश हिरामण पाटील यांनी केले आहे. 

रिक्षा चालकांना मास्क आणि  सनिटायझर वाटप महाराष्ट्र नवनिर्मान लॉट्री सेनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन मोरजकर यांनी केले आहे. तर वाढदिवसानिमित्ताने साधना आधार वृद्ध सेवा केंद्र येथे महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य मनसेचे रमेश रामचंद्र यादव यांनी दिले आहे. 

यावेळी जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,प्रकाश माने,दिपीका पेडणेकर,कोमल पाटील,स्वप्ना पाटील,ज्योती खवसकर,मिलींद म्हात्रे,दिपक शिंदे,संदिप म्हात्रे,रविंद्र गरुड,सुहास काळे,दिप्तेश नाईक,रमेश यादव,प्रदिप बावसकर,परेश भोईर,प्रेम पाटील,उदय वेळासकर आदी उपस्थित होते.

Edited By - Puja Bonkile 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com