कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना खासदार भावना गवळींकडून मोफत भोजन व्यवस्था

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना खासदार भावना गवळींकडून मोफत भोजन व्यवस्था
Saam Banner Template (1).jpg

वाशिम : कोरोनाच्या Corona  संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने Government कडक निर्बंध लावले आहेत. या लॉकडाऊनमध्ये Lockdown जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह हॉटेल्स, Hotels खानावळी Mess यांच्यावर देखील काही प्रमाणात निर्बंध आहेत.  Free Meal Arrangements By MP Bhavana Gawali

त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणासाठी परवड होत आहे. या रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर जेवण मिळावं यासाठी यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना Shivsena खासदार भावना गवळी Bhavana Gawali यांनी पुढाकार घेत कोविड सेंटरवर जेवण उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना  दिलासा मिळाला आहे.

हे देखील पहा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना जेवण मिळणे कठीण झाले आहे. Free Meal Arrangements By MP Bhavana Gawali

त्यामुळे खासदार भावना गवळी यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना जेवण मिळालं पाहिजे अशी सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना केली होती. वाशिम शहरात जवळपास 150 ते 200 जणांना रोज जेवणाचे डब्बे या माध्यमातून खासदार गवळी यांच्यामार्फत पोहचविले जात आहेत.

Edited By : Krushna Sathe 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com