बीडमध्ये 'द कुटे ग्रुपचा' मदतीचा महायज्ञ सुरू;  कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था सुरू...!

बीडमध्ये 'द कुटे ग्रुपचा' मदतीचा महायज्ञ सुरू;  कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची मोफत व्यवस्था सुरू...!
free meal

बीड - जिल्ह्यात कोरोनाचा Corona समूहसंसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरी भागात थैमान घालणारा कोरोना, आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या उपचारासाठी, ग्रामीण भागातील नागरिकांची वणवण सुरु आहे. त्यात जेवणाचे वांदे देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हा ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाईकांना relatives होणारा ताण काहीसा दूर व्हावा. यासाठी 'द कुटे ग्रुप'ने Kute Group मदतीचा Help महायज्ञ सुरू केला आहे. Free meals for relatives of Corona patients 

बीड Beed जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असताना प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. एकीकडे इंजेक्शन Vccine साठी धावपळ तर दुसरीकडे जेवणाची फरफट सुरु आहे. ही होणारी फरफट थांबावी यासाठी कोरोना रुग्णांसह नातेवाईकांच्या मदतीला आता 'द कुटे ग्रुप' समोर आला आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात जे  कोरोना रुग्णांचे नातेवाईक दररोज ये-जा करतात, त्यांच्यासाठी जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.दोन वेळचं जेवण कुठे ग्रुपचे आधारवड, स्वर्गीय ज्ञानोबा अण्णा कुठे यांच्या स्मरणार्थ देण्यात येत आहे.

 'द कुटे ग्रुप' कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच सर्वसामान्यांच्या मदतीला धावलेला आहे. गतवर्षी ऊसतोड कामगारांना देखील जेवणाची व्यवस्था कुटे ग्रुपने केली होती. त्याचबरोबर शहरातील जे बेघर व्यक्ती आहेत, शहरात कर्तव्यावर असणारे कर्मचारी आहेत. त्यांचा देखील नाश्ता, चहापाणी, जेवणाची व्यवस्था कुटे ग्रुपने केली होती. या वेळेला देखील कुटे ग्रुपच्या वतीने, शहरात विविध विभागातील कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, दोन वेळेच्या चहा, नाश्त्याची, व्यवस्था करण्यात आली आहे. तर आता जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांना देखील कुटे ग्रुपच्या वतीने मोफत जेवण दिलं जात आहे. Free meals for relatives of Corona patients 

दरम्यान 'द कुटे ग्रुपने' सुरु केलेला हा मदतीचा महायज्ञ, सर्वसामान्यांसाठी आधार बनला असून या महायज्ञच्या माध्यमातून अनेकांना दोन वेळेचे जेवण तर किती गरजवंतांना दिलासा मिळाला आहे. यामुळे 'द कुटे ग्रुप' नं एक प्रकारचा आदर्शच निर्माण केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com