संचारबंदीच्या काळात जालन्यात खेळ रंगला..!

संचारबंदीच्या काळात जालन्यात खेळ रंगला..!
Saam Banner Template (24).jpg

जालना : राज्यात कोरोनाचा Corona वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने State Government कोरोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून कडक संचारबंदीचे Curfew नियम घातले आहेत. असे असताना देखील  भोकरदन Bhokardan तालुक्यातील पारध पोलिस Police ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेणुकाई पिंपळगाव परिसरात मात्र सरासपणे जुगार Gambling अड्डे सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. The Game Was In Full Swing During The Curfew

हे देखील पहा -

परिसरातील शेताच्या परिसरात "अंदर- बाहर" पत्याचा डाव सुरू असल्याचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. जिल्ह्यात जमाव बंदीचा आदेश असताना हे जुगारी सोशल डिस्टन्सिंग च्या नियमाला हरताळ फासत हे अड्डे चालवत लावत असल्याची बाब समोर आली आहे.

पारध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २५ गावातील हे जुगारी कोरोनाच्या महामारीत परिसरात सर्वत्र बंद असताना दररोज 'अंदर-बाहर' चा डाव मांडत या डावातून हजारो रुपयांची उलाढाल रोज होत असल्याची माहिती समोर आली आहे.The Game Was In Full Swing During The Curfew 

मात्र हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे असताना हे जुगार अड्डे सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, यांच्यावर कारवाई करणार तरी कोण ? असा प्रश्न निर्माण आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com