मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग: नियोजनशून्य कारभारामुळे गांधारपाले गावाला पाण्याचा विळखा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग: नियोजनशून्य कारभारामुळे गांधारपाले गावाला पाण्याचा विळखा
Gandharpale Citizens are experiencing the bad impact of rain water

रायगड:   मुंबई गोवा महामार्गालगत Mumbai Goa Highwayअसलेल्या गांधार पाले Gandharpale या गावाजवळ सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगात सुरु असुन महामार्ग पुर्णत्वाच्या दिशेने चालला आहे . मात्र हे काम करत असताना काही ठिकाणी चुकीच्या नियोजन झाल्याचे चित्र व्हायरल व्हिडीओ मध्ये समोर आले आहे.   Gandharpale Citizens are experiencing the bad impact of rain water

महाड शहरा लगत असणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गांधार पाले गावला अक्षरशः मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरण कामाचा फटका बसताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी मध्य रात्री मान्सून पूर्व Pre Monsoon झालेल्या अवकाळी पावसाने या गावातील नागरिकांची झोप उडवली. पावसाळ्याला सुरवात झाली नाही तोच या ठिकांच्या नागरिकांना पावसाच्या पाण्याचा फटका बसल्याचे दिसुन येत आहे. 

पावसाचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात पाणी शिरल्याने या गावातील नागरिक हवालदिल झाले आहेत. पावसाळ्यात आम्हाला आमचे गाव सोडून जाण्याची पाळी येते की काय असा प्रश्न या ठिकाणच्या  नागरिकांना पडला आहे.

गांधार पाले गावच्या हद्दितुन "राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ मुंबई गोवा" मार्ग जात असून या गावच्या जवळ प्रशासनामार्फत एक पुल बांधण्यात आला आहे. मात्र डोंगरातून येणारे पाणी, सांडपाणी किंवा पावसाच्या पाण्याचे निचरा होण्यासाठी कोणतीही काळजी प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या ठीकाणच्या नागरीकांचे मोठे हाल होणार असल्यांच सांगितले जात आहे.

हे देखील पहा -

 प्रशासनाने लवकरात लवकर सदर बाबीचा विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला गाव सोडून जाण्याची वेळ येइल. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आम्ही रास्ता रोको  Agitation करू असा इशारा देखिल नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com