सोलापुरात लसीकरणासाठी तरुणाचं 'गांधीगिरी' शैलीत आंदोलन

सोलापुरात लसीकरणासाठी तरुणाचं 'गांधीगिरी' शैलीत आंदोलन
solapur

सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढतच आहे. यामध्ये तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं तात्काळ लसीकरण सुरु व्हावं यासाठी सोलापुरातील राज सलगर हा तरुण गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करतोय. शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये हा तरुण लसीकरणाचा फलक घेऊन शांत पद्धतीने आंदोलन करत आहे. सध्या सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे लसींचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी तरुणांच्या लसीकरणासाठी राज सलगर हा तरुण धडपड करत असताना पाहायला मिळतं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे सोलापूरमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. निवडणुकीच्या अगोदर सोलापूरमध्ये रुग्णसंख्या कमी प्रमाणात होती. निवडणुकीनंतर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख अचानक वाढला.(Gandhigiri style movement for vaccination in Solapur)

काही दिवसांपूर्वी मंगळवेढ्यात ४१ मतिमंद  मुलांना कोरोनाची लागण झाली होती. लसीकरण्याच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. केंद्र सरकारर  ५० टक्के लस खरेदी करणार आहे. त्याचबरोबर, उर्वरित ५० टक्के लस राज्य आणि खाजगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे.  

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com