महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला मिळाले जीवनदान
The Ghonas snake

महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला मिळाले जीवनदान

सांगली -  पाण्याच्या शोधात, जनावरांच्या भांडणात, रात्री विहीर न दिसल्यामुळे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला Ghonas snake ॲनिमल राहतने जीवदान  lifeline दिले आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी मध्ये 60 फूट खोल विहिरीत हा साप snake पडला होता. The Ghonas snake, which had been stuck in the well for a month, got a lifeline

मिरज तालुक्यातील बेळंकी येथील प्रमोद कोथळे यांच्या विहरीतुन अथक परिश्रमानंतर घोणस जातीच्या सापाला वाचवण्यात यश आले आहे. विहिरीला संरक्षण कडा नसल्याने साप त्या विहिरीत पडला असल्याची शंका आहे.  साप पडल्याची माहिती ॲनिमल राहत यांना व्हाट्सएप ग्रुप मधून मिळाली. त्यांनी लगेच विहीर मालकांशी संपर्क साधून घटनेची खात्री केली आणि ॲनिमल टीम बेळंकीत पोहचले.

विहिरीची पाहणी केली असता जवळ जवळ साठ फूट खोल विहरीत घोणस जातीचा साप अत्यंत दमलेल्या अवस्थेत पाण्याकडेला दगडावर बसलेला आढळला. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या नसल्याने आधुनिक सुरक्षा साधनांचा वापर करून 60 फूट खोल विहिरीत उतरवण्यात आले. कौस्तुभ यांनी अंत्यत अवघड परिस्थिती घोणस सापाला मानवीय पद्धतीने हाताळणी करून सुरक्षित पकडले आणि सापाला दोरीच्या सहाय्याने अलगद वरती घेतले. विहिरीतून वर काढून थोडी विश्रांती देऊन सापाला पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले असे अनिमल राहत यांनी सांगितले. 

ॲनिमल राहनते गेल्या काही वर्षात उघड्या विहिरी मधून बैल, गाई, म्हशी, कोल्हा, लांडगा, हरीण, साप, ईजाट, कुत्रा मांजर अश्या वेगवेगळ्या 200 च्या वर पशूपक्ष्याना काढून त्यांना जीवदान दिले आहे. उघड्या विहिरीमध्ये जंगली तसेच पाळीव जनावरे पडण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे. ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच्यावरती उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अश्या उघड्या विहिरीना सुरक्षित भीती बांदण्याचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.


Edited By - Puja Bonkile

हे देखिल पहा - 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com