गोव्यात पहाटे २ ते ६ या वेळेत ऑक्सिजन अभावी  दगावले ७५ रुग्ण
jejuri oxygen

गोव्यात पहाटे २ ते ६ या वेळेत ऑक्सिजन अभावी  दगावले ७५ रुग्ण

गोवा:  गोव्यात Goa कोरोना Corona रुग्णांचा प्राणवायू Oxygen अभावी मृत्यू झाले आहेत. ऑक्सिजन अभावी आणखीन १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे गेल्या चार दिवसांत प्राणवायू न मिळाल्याने कोरोना मृतांची Death संख्या ७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा १९९८ एवढा झाला आहे. In Goa 75 patients corona patients died due to lack of oxygen supply

गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (जीएमसीएच) Goa Medical College and Hospital या संस्थेत प्राणवायू तुटवड्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मृत्यप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या High Court गोवा खंडपीठात सध्या सुनावणी चक्र सुरू आहे. असे असताना पुन्हा 13 रुग्णांचा प्राणवायूअभावी बळी गेला; परंतु गेल्या चार दिवसांत झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमागील नेमके कारण गोवा सरकारने न्यायालयात सांगितले नाही.

हे देखील पहा -

प्राणवायूच्या वाहतुकीशी संबंधित अडचणी आहेत, असे कारण न्यायालयात देऊन गोवा सरकारने Government of Goa वेळ मारून नेली असे म्हटले जात आहे. या कारणांचा शोध घेण्यासाठी सरकारने डॉ जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय कमिटी स्थापन केली आहे. हे सदस्य या मृत्यू मागील नेमकी कारणे शोधून काढणार आहेत. In Goa 75 patients corona patients died due to lack of oxygen supply

प्राणवायू पुरवठ्यात व्यत्यय प्राणवायूच्या वाहतुकीमध्ये काही त्रुटी असल्या होत्या. असे गोवा सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले होते. मंगळवारी प्राणवायू भरला जात असताना काही अडचण आल्या होत्या. गोवा सरकारने न्यायालयात असेही सांगितले कि, याशिवायही इतर काही घटक त्याला कारणीभूत असू शकतात. 

सरकारी आकडेवारीनुसार ‘जीएमसीएच’ मध्ये मंगळवारी २६ रुग्ण, बुधवारी २१ रुग्ण, गुरुवारी १५ रुग्ण, तर शुक्रवारी १३ रुग्ण अशा आत्तापर्यंत एकूण ७५ करोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू प्राणवायूचा वेळेत पुरवठा न झाल्याने झाले आहेत. असा आरोप करण्यात येत आहे. ही सर्व मृत्यु पहाटे 2 ते सकाळी 6 या वेळेत झाले आहेत. In Goa 75 patients corona patients died due to lack of oxygen supply 

गोव्यात आत्तापर्यंत १ लाख ३२ हजार ५८५ बाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी ९८ हजार २०० रुग्ण बरे झाले आहेत. यात नव्याने २९६० रुग्णांची भर पडली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२ हजार ३८७ झाली आहे. काल ६७६९ संशयितांच्या चाचण्या केल्या असता, त्यात २४५५ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. हा पॉझिटिव्हिटीचा रेट सध्या कमी होत आहे. 

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com