धक्कादायक प्रकार; चक्क देवच गेले चोरीला..  

धक्कादायक प्रकार; चक्क देवच गेले चोरीला..  
God was stolen in Nashik

नाशिक : श्री क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिरातील Vaijnath Mahadev Temple महादेवाच्या पंचधातू मुकुटासह पार्वती मातेच्या मूर्तीची चोरी झाल्याची घटना मालेगाव Malegaon तालुक्यातील देवघट Devghat या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. God was stolen in Nashik

मंदिरातील पंचधातूच्या अडीच लाखांहून अधिक किंमतीच्या वस्तूंची चोरीला गेले आहेत. नाशिकमध्ये Nashik चक्क देवच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील देवघटमध्ये ही घटना घडली. देवघटच्या श्री वैजनाथ महादेव मंदिरातील महादेवाच्या पंचधातूच्या मुकुटासह पार्वती मातेची मूर्ती चोरीला गेली आहे.

सकाळी मंदिरातील पुजारीला हा प्रकार लक्षात आला. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या तिन्ही दरवाजांचे कुलूप Lock तोडून आत प्रवेश केले आहे. चोरट्यांनी मंदिरातील 55 किलो वजनाचा महादेवाचा मुकुट, 25 किलो वजनाची पार्वती मातेची मूर्ती, 35 किलो वजनाच्या मंदिरामधील घंटा, 10 किलो वजनाची तांब्याची घागर, 1 किलो वजनाचं पंचारतीचं ताट असा तब्बल अडीच लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरून नेण्यात आले आहे. God was stolen in Nashik

हे देखील पहा 

याआधी या ठिकाणी 3 वेळा अशाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही. मागच्या चोरीच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पुन्हा देवाचा पंचधातूचा मुकुट, देवीची मूर्ती तयार करून त्यांची मंदिरात विधिवत पुनर्स्थापना केली होती. मंदिरात पुन्हा देवाच्या मूर्ती आणि मुकुटाची चोरी झाल्यानं या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं, अशी मागणी गावकरी करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com