अरे देवा! ऐन लग्नसराईत सोनं प्रतितोळा 50 हजार होणार?

अरे देवा! ऐन लग्नसराईत सोनं प्रतितोळा 50 हजार होणार?
Gold

मुंबई - सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं तोळ्यामागं तब्बल १ हजार 80 रुपयांनी वाढलं आहे. आता सोन्याचा तोळ्याचा दर 45 हजार 650 रुपयांवर पोहचला आहे. महिन्यारापासून सोन्याचा दर चढाच आहे. त्यात आणखी मोठी भर पडली आहे. त्यामुळं ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी आता खिसा जास्त खाली करावा लागणार आहे.

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील चढ उतार, आर्थिक मंदी, रुपयाचं घसरलेलं मूल्य या सगळ्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येतो आहे. अशातच सोन्याचे दर आता लवकरच 50 हजार प्रतितोळा पर्यंत जातील की काय अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

जीडीपीमधील घसरणीमुळे एकूण बाजारातील व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय. गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. अशातच आता सोन्याच्या दरांना प्रतितोळा 45 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. लवकरच हा दर आता 50 हजार झाला, तर सोनं घेणं सर्वसामान्यांना कितपत परवडले, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याआधी सोन्याचे दर 40 हजार रुपयांच्या पार जातील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र 40 हजारच काय आता तर 50 हजार रुपये प्रतितोळा सोन्याचे दर झाले, तर आश्चर्य वाटायला नको, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कोरोना वायरलमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. हा परिणाम सोन्याच्या दरांवरही होत असल्याची चित्र सध्या बाजारात पाहायला मिळतंय. अशातच ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसेल, या शंक नाही. 

पाहा व्हिडीओ - 

gold rate will reach to 50 thousand corona effect share market mumbai finance money cash wedding people maharashtra india

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com