क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; 18,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये पाहता येणार सामना 

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; 18,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये पाहता येणार सामना 
eng vs nz

इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ ) यांच्यात एजबॅस्टन (Edgbaston Stadium) येथे होणारी दुसरी कसोटी दररोज 18,000 प्रेक्षकांना पाहता येईल.  कारण मोठ्या संख्येने लोक एकत्रित आल्यावर कोरोनाचा संसर्ग पसरतोय का याचे विश्लेषण इंग्लंड सरकारला करायचे आहे.  हे प्रेक्षक मैदान क्षमतेच्या 70 टक्के असतील. एजबॅस्टन क्रिकेट मैदान प्रशासनाने बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, “एजबॅस्टन कसोटी सामन्याची मुल्यांकन स्पर्धा म्हणून निवड झाली आहे. आम्ही दररोज 18 हजार दर्शकांना मैदानात प्रवेश देणार आहोत. तिकिट धारकांना ईमेलद्वारे पुढील माहिती दिली जाईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून चाचणी, मार्गदर्शक तत्वे आणि सामाजिक अंतर व्यतिरिक्त कोविड -19 संबंधित इतर मार्गदर्शक सूचनांचे मूल्यांकन केले जाईल.(Good news for cricket fans; 18,000 spectators will watch the match)

 हे देखील पाहा 

सरकारच्या म्हणण्यानुसार, मैदानात प्रवेश करण्यासाठी प्रेक्षकांना रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेला अहवाल द्यावा लागेल. हा अहवाल मागच्या 24 तासातला असणे  बंधनकारक असणार आहे. मैदानात प्रवेश करण्यासाठी वय वर्ष 16 पूर्ण असणे बंधनकारक आहे.   इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 ते 6 जून दरम्यान लॉर्ड्स येथे खेळवला जाणार आहे. त्यावेळी मैदानावर 25 टक्के प्रेक्षकांची क्षमता असेल. लॉर्ड्स क्रिकेट मैदान  प्रशासनाने म्हटले आहे की, "इंग्लंडमधील कोविडशी संबंधित निर्बंधांवर ब्रिटन सरकारच्या शिथिलतेचा एक भाग म्हणून, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 2 ते 6 जून दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर 25 टक्के दर्शक असतील. जर कोणी तिकीट घेतले असेल तर त्यांना त्याचे पैसे परत केले जातील'''. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जूनमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनादेखील खेळला जाईल. अशी अपेक्षा आहे की कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चाहत्यांनी मैदानावर जाऊन सामन्याचा आनंद घेता येईल.

Edited By : Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com