मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी: कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त !

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी: कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त !
coronavirus

मुंबई: मुंबईत Mumbai कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्ण संख्येचा स्फोट प्रशासनासमोर Administration मोठी अडचण निर्माण करत होतं . दैनंदिन वाढणारी रुग्ण संख्या रोखण्यासाठी राज्य शासनाने अखेर कडक निर्बंध Restrictions लावण्याचे ठरवले आणि त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. Good news for Mumbai as the decrease in the number of corona patients

१५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंध अधिक कठोर केले. त्या दिवशी मुंबईत ८२१७ रुग्ण आढळले होते. तर एकूण रुग्णांची संख्या ८५,४९४ इतकी होती . रुग्ण बरे होण्याचा दर ८२% होता आणि रुग्ण दुपटीचा दर ४२ दिवस होता .

२२ तारखेच्या रात्री पासून अखेर मुंबईसह राज्यभरात State हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर सर्व सामान्य नागरिकांसाठी इतर सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्या. त्या दिवशी मुंबईत ७४१० बाधित रुग्ण आढळले होते. तर एकूण सक्रिय रुग्ण Active case ८३९५३ इतके होते . बरे होण्याचा दर ८४% होता . तर रुग्ण दुपटीचा दर ५० दिवसांवर आला होता.

त्यानंतर गेल्या ८ दिवसातील कडक निर्बंधाचा मुंबईला मोठा फायदा झाला असे म्हणायला हरकत नाही . कारण मुंबईत ८ तारखेपासून आता ही रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. २८ तारखेला मुंबईत ४९६६ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण सक्रिय रुग्ण ६५५८९ इतके आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दर ८७% इतका झाला आहे आणि रुग्ण दुपटीचा दर ७४ दिवसांवर गेला आहे .

त्यात आता हे निर्बंध राज्य सरकारने आणखी १५ दिवस वाढवल्यामुळे ही रुग्ण संख्या आणखी कमी होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. तसेच राज्यात इतर ठिकाणी सुद्धा वाढती रुग्णसंख्या कमी होईल अशी आशा बाळगणे चुकिचे ठरणार नाही. 

Edited by- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com