दिलासादायक : नाशिकमध्ये सलग दोन दिवस राहिला ऑक्सिजन शिल्लक

दिलासादायक : नाशिकमध्ये सलग दोन दिवस राहिला ऑक्सिजन शिल्लक
Oxygen

नाशिक : कोरोना रुग्णांचा रुग्णालयांवरील Hospital ताण हलका झाला आहे. डॉक्टरांना खाटांसाठी येणाऱ्या निरोपांमध्ये २५ ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे. याचाच अर्थ असा, की रुग्णसंख्या वाढीचा दर काहीसा मंदावला आहे.Good News for Nashik Oxygen Saved for Two Consecutive Days 

त्याचवेळी नाशिकसाठी Nashik उपलब्ध होणाऱ्या लिक्वीड ऑक्सिजनचे Liquid Oxygen प्रमाण चांगले राहिल्याने महाराष्ट्रदिनी Maharashtra Day रुग्णालयांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करुन ४३.३४ टन ऑक्सिजन शिल्लक राहिला होता. रविवारी (ता. २) पुन्हा ३४.३६ टन ऑक्सिजन शिल्लक राहिला. त्यामुळे सलग दोन दिवस दुसऱ्या दिवसासाठी शिल्लक ऑक्सिजनचा उपयोग करणे शक्य झाले. 

जिल्ह्यातील सनी इंडस्ट्रीजतर्फे ४.११, अक्षय ऑक्सिजनतर्फे २.९८, रविंद्र ऑक्सिजनतर्फे १०.४२, स्वस्तिक एअरतर्फे १ अशा एकुण १८.५१ टन ऑक्सिजनचे उत्पादन केले. याशिवाय पिनॅकलतर्फे २२.३३, नाशिक ऑक्सिजनतर्फे ५.४०, निखील मेडिकोतर्फे ३.९०, गजानन गॅसेसतर्फे ५, श्रीगणेशतर्फे २८.६६ अशा एकुण ६५.२९ टन ऑक्सिजनचे रिफिलिंग करण्यात आले. अशा पद्धतीने महाराष्ट्रदिनाच्या शिल्लक ऑक्सिजनसह रविवारी १२७.१४ टन ऑक्सिजन Oxygen उपलब्ध झाला होता. प्रत्यक्षात रुग्णालयांना ९२.७८ टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. रविवारी ९२ टन लिक्वीड ऑक्सिजन उत्पादकांसाठी उपलब्ध झाला होता. Good News for Nashik Oxygen Saved for Two Consecutive Days 

पिनॅलकलसाठी महाराष्ट्रदिनाचा १७ टन कोटा रविवारी मिळाला. त्याचवेळी लिंडे कंपनीचा १७ टनाचा ऑक्सिजन जळगाव आणि नाशिकच्या मार्गावर होता. ही माहिती आज अन्न-औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे आणि सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांनी ‘सकाळ'ला दिली.

ऑनलाइन खाटांची संख्या वाढली
ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या गोंधळाच्या परिस्थितीत एक प्रमुख समस्या पुढे आली होती. ती म्हणजे, खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवली होती. पण ती दप्तरी नोंद नसल्याने उपलब्ध ऑक्सिजन आणि मागणीचा याचा ताळमेळ जुळवणे कठीण झाले होते. त्यावर उपाय म्हणून आय. एम. ए. तर्फे रुग्णालयांना प्रत्यक्षात ऑक्सिजनच्या खाटांची माहिती देण्याची सूचना देण्यात आली असताना अन्न-औषध प्रशासनतर्फे रुग्णालयनिहाय ऑक्सिजनच्या मागणीचे परीक्षण सुरु झाले. त्याचा परिणाम म्हणजे, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनच्या खाटांची संख्या वाढल्याचे चित्र पुढे आले आहे. Good News for Nashik Oxygen Saved for Two Consecutive Days 

रुग्णालयांची ऑक्सिजन प्रकल्पाची तयारी
शहरातील खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. ही माहिती एव्हाना जिल्हा प्रशासनापर्यंत पोचली आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्पासाठी सरकारी योजनांची मदत हवी आहे. त्यादृष्टीने शहरातील काही ज्येष्ठ डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com