'करूया जागर धनगर आरक्षणाचा' पडळकरांचे धनगरी वेशात आवाहन (पहा व्हिडीओ)

'करूया जागर धनगर आरक्षणाचा' पडळकरांचे धनगरी वेशात आवाहन (पहा व्हिडीओ)
gopichand padalkar

सांगली : Sangli येत्या ३१ मे रोजी देशातील समस्त बहुजनांच्या  Bahujan प्रेरणास्त्रोत माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी Ahilyadevi Holkar होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून धनगरी वेशात ही जयंती साजरी करणार आहोत.

धनगर Dhangar आरक्षणाचा Reservation जागर करून या महाविकास आघाडीला आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी समस्त धनगर समाजाला धनगरी वेशात केले आहे.

धनगर आरक्षणाचा निर्धार मनाशी पक्का करायचा आहे. यंदा कोविडमुळे Covid जयंती Jayanti मोठ्या स्वरूपात साजरी करता येणार नाही. परंतु आपल्या घरातूनच सर्वांनी आपल्या धनगरी पोशाखात अहिल्यामातेला वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे. 

चौंडी (ता.जामखेड) येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे गोपीचंद पडळकर धनगर समाजाला संवाद साधणार आहेत. त्यावेळी कमेंटमध्ये आपले पारंपारिक पोशाखातील फोटो टाकून आपली ताकद दाखवन्याचे आव्हान पडळकर यांनी केले आहे.या माध्यमातून धनगर आरक्षणाचा जागर करायचा आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com