आरोग्य मंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का - गोपीचंद पडळकर

आरोग्य मंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का - गोपीचंद पडळकर
gopichand

सांगली - 1 तारखेपासून 18 ते 45 वय असणाऱ्यांना मोफत लसीकरण  करणार अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आणि दुपारी वेगळी प्रेस घेऊन काहीतरी वेगळच बोले. आरोग्य मंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का अशी टीका गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी केली आहे. ते सांगली Sangli मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकार गंभीर नाही निष्क्रिय सरकार Government आहे. तर मुळात हे तिन्ही पक्ष भाजपची जीरावण्यासाठी एकत्र आले आहेत. असेही पडळकर यावेळी म्हणाले. Gopichand Padalkar on health minister rajesh tope

पुढे पडळकर म्हणाले की, मेडिकल मध्ये रेमडिसिव्हिर इंजेक्शन Vaccine मिळत होते पण आता मिळत नाहीत. शासकीय रुग्णालयात इंजेक्शन मिळत नाहीत. कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती इंजेक्शन दिले ती माहिती दिली पाहिजे. यात हाथ धून घायचे काम राज्य सरकार करत आहे. केवळ वसुलीची भूमिका या सरकारची आहे. खालची लोक पण तसेच वागत आहेत आता आपण  राज्य सरकारची गेम ओळखली पाहिजे.

तसेच पालकमंत्री यांनी टीव्ही वर बातम्या येण्यासाठी बैठक घेतल्या आहेत.निष्क्रिय पालकमंत्री म्हणून इतिहासात नोंद होईल अशी टीका पडळकर यांनी आरोग्य मंत्र्यांवर केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com