महाराष्ट्राचे वाटोळे करायचे या सरकारने ठरवले - चंद्रकांत पाटील 

महाराष्ट्राचे वाटोळे करायचे या सरकारने ठरवले - चंद्रकांत पाटील 
chandrakant-patil

सांगली  - आरक्षण व इतर मुद्यांवरून राज्याचे  वाटोळ करण्याचे काम महाविकास सरकारकडून सुरू असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. वाघ पिंजऱ्यात असल्याचे संजय राऊत यांनी मान्य केले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. This government has decided to destroy Maharashtra says Chandrakant Patil

ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडली गेली नाही. जे फडणवीस सरकारने केले ते या सरकारला करता आले नाही.फक्त भेटी घेण्याचा प्रकार सुरू आहे. तुम्ही समाजाला मुर्ख समजता काय ? असा सवाल उपस्थित केला.200 पानी अहवाल न्यायालयात सादर केला तो माझ्या सारख्या अनपढला समजला मग तुम्हाला का कळत नाही. एवढंच जर कळत तर मग रिव्ह्यू दाखल करा.  सरकारकडून फक्त चालढकल पणा सुरू आहे. ओबीसी समाजाला जे दिले ते मराठा समाजाला देखील देण्यात काय अडचण आहे. 

हे देखील पहा -

राष्ट्रवादीकडून मराठा आरक्षण मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 कोटी पत्र लिहण्याच प्रकार हा दिशाभूल करणारा आहे. त्याच बरोबर सरकारच्या निष्क्रियेतेमुळे ओबीसी आरक्षण बाबत देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या महाराष्ट्राचे वाटोळे करायचे या सरकारने ठरवले आहे असे ते म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com