सरकारी रुग्णालये आणि राज्यसरकारांना कमी किमतीत मिळणार DRDOचे 2-डीजी औषध

सरकारी रुग्णालये आणि राज्यसरकारांना कमी किमतीत मिळणार DRDOचे 2-डीजी औषध
2 Dg, dr. reddies.jpg

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने  DRDO विकसित केलेल्या कोविड 19 औषध 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज 2-DG बद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. DRDO'ने आपल्या  कोरोना ड्रग 2-डीजी कमी खर्चात सरकारी रुग्णालये Government Hospitals, केंद्र Central आणि राज्य सरकारांना State Government पुरवली जाणार आहेत.   याबाबत  सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  डॉ रेड्डीज लॅबने विकसित केलेल्या डीआरडीओच्या 2 डीजी अँटी कोविड 19 औषधाची किंमत प्रति पाउच 990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासकीय रूग्णालये, केंद्र व राज्य सरकारला  ती सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.   (Government hospitals and state governments will get DRDO's 2-DG drug at a lower price) 

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO यांनी विकसित केलेल्या कोविड -19 मेडिसिन टू डीजीच्या पाउचची किंमत 990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.  तथापि, डॉ. रेड्डीज लॅबकडून गुरुवारी (27 मे ) सरकारी रुग्णालये, केंद्र आणि राज्य सरकारांना ती कमी किंमतीत दिली जाणार असून  2 डीजीची दुसरी खेप उपलब्ध करून देण्यात आली.  दुसऱ्या खेपेत 2 डीजी औषधांची 10,000 पाकीटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता लवकरच  हे औषध बाजारातही उपलब्ध होणार आहे. कोविड 19 दुसर्‍या लाटेने देशात सुरू असलेल्या संघर्षांच्या दरम्यान डीआरडीओने विकसित केलेल्या 2-डीजीची पहिली खेप 17 मे रोजी उपलब्ध करून देण्यात आली होती. 

कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांवर 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) औषधाच्या आपत्कालीन वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने DCGI मान्यता दिली आहे.  संरक्षण मंत्रालयाने 8 मे रोजी याबाबत  निवेदन जाहीर केले होते.  त्यानुसार, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांचे ऑक्सिजन अवलंबन कमी करण्यास 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)  अत्यंत परिणामकारक असल्याचे क्लिनिकल चाचण्यांमधून दिसून आले आहे.  तसेच, रुग्ण या औषधाने वेगाने बरे होत असल्याचे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, देशातील कोरोना व्हायरसमुळे बिघडणारी परिस्थिती लक्षात घेता, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय)  covid 19च्या गंभीर रुग्णांसाठी 2- डीऑक्सी- डी-ग्लूकोज (2-डीजी) औषधांच्या वापरास आपत्कालीन मंजूरी देण्यात आली.  कोविड रूग्ण. डी-ग्लूकोज (2 -डीजी) च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली. डॉ. रेड्डीज प्रयोगशाळा Dr. Reddy’s Laboratories, औषध संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस INMAS ने ही औषध विकसित केले आहे. 

2-डीजी च्या वैद्यकीय क्लिनिकल चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. रुग्णांमध्ये या औषधाची ट्रायल घेण्यात आल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या औषधाच्या वापरामुळे गंभीर आजारातील रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबीतव कमी झाल्याचेही आढळून आले. तसेच,  औषध वापरामुळे  इतर रुग्णांच्या तुलनेत ट्रायल घेतलेलया रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही वाढले आहे. उर्वरित रुग्णांच्या तुलनेत रुग्णांचा कोरोना अहवाल नकारात्मक होत असल्याचा दावाही केला जात आहे. म्हणजेच ते रुग्ण लवकरात लवकर बरे होत आहेत. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com