भाजपचे १२ सदस्य वाढतील या स्वप्नात राज्यपाल - राजू शेट्टी 

भाजपचे १२ सदस्य वाढतील या स्वप्नात राज्यपाल - राजू शेट्टी 
raj

सांगली - महाविकास आघाडी सत्तेवरून खाली येईल आणि भाजपचे BJP बारा नावे राज्यपालांच्या governor कडे जातील आणि भाजपचे आमदार वाढतील अशी स्वप्न त्याची आहेत. पण त्याचे स्वप्न काही पूर्ण होणार नाही.आज ना उद्या राज्यपाल यांना बारा सदस्याचा निर्णय घ्यावाच लागेल. असे वक्तव्य माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी raju shetti यांनी केले. ते सांगली Sangli मध्ये बोलत होते. governor is dreaming about BJP 12 members of will grow says raju shetti

हे देखील पहा -

सरकार कडून मंत्री मंडळात ठराव करून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे गेल्यानंतर राज्यपालानी नकार देने किंवा परत पाठवणे हा अधिकार निश्चित नाही.पण एकाच गोष्टीचा गैरफायदा राज्यपाल यांनी घेतला आहे. तो म्हणजे राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव गेल्यावर तो कधी पर्यंत द्यायचा हा त्याचा निर्णय असतो. राज्यपालाना हे अभिप्रेत नाही पण ते तसे करताना दिसत आहेत असे देखील राजू शेट्टी म्हणाले.  

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com