यवतमाळमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त
yavatmal

यवतमाळमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त

यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरी येथील एका किराणा दुकानावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून जवळपास आठ लाख रुपये किंमतीच्या मजा नामक सुगंधित तंबाखूसह, सुगंधीत सुपारी, गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. Gutka worth Rs 8 lakh seized in Yavatmal

हि कारवाई १५ जुन रोजी दुपारी एक वाजता दरम्यान करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी तयार केलेल्या विशेष पथकाच्या कारवाईने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.

हे देखील पहा -

या विशेष पथकाकडून कारवाईचा धडाका सुरू असताना, पथक प्रमुख सह पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथील झामड यांच्या किराणा दुकानावर धाड टाकली.

या कारवाई दरम्यान दुकानातील गोडाऊनमध्ये मजा, ईगल, १२० नामक सुगंधित तंबाखू सह सुगंधित सुपारी व गुटखा पुड्या असा एकूण ८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रितेश झामड यांना अटक केली असून प्रकरण अन्न व औषध प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक वणी व पांढरकवडा उपविभाग प्रमुख सह पोलीस निरीक्षक मुकुंद एस कवाडे, राजु बागेश्वर यांनी पार पाडली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com