खामगाव मध्ये पकडला लाखोंचा गुटखा; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

खामगाव मध्ये पकडला लाखोंचा गुटखा; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
buldhana buldhana

बुलढाणा : इंदोर Indore वरून अकोल्याला Akola जाणारा लाखो रुपयांच्या अवैध गुटखा Gutkha खामगाव Khamgaon पोलिसांनी पकडला आहे. आयशर ट्रकमधील इतर सामान खाली करण्यासाठी ट्रक खामगावात काही काळ थांबला असता पोलिसांना या अवैध गुटख्याबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. Gutkha Worth Lakhs Seized In Khamgaon City Police Crackdown

या कारवाईत १७ लाख रुपयांचा अवैध गुटखा,सुगंधित तंबाखू आणि इतर मुद्देमाल असा जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खामगाव येथील आठवडी बाजार भागात असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मध्ये  गुटखा येणार असल्याची माहिती शहर पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली होती.

या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक आठवडी बाजारामध्ये असलेल्या नीलम ट्रान्सपोर्ट मध्ये तपासासाठी गेले. Gutkha Worth Lakhs Seized In Khamgaon City Police Crackdown

त्या ठिकाणी एम एच-१९ झेड-४२७९ नंबरच्या आयशर मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व शरीरास अपायकारक असलेला गुटखा सदर गाडीमध्ये आढळून आला. यामध्ये राज निवास गुटख्याच्या पोतडया व चारचाकी वाहन असा २५ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी Police जप्त Confiscated केला आहे.

Edited By  : Krushnarav Sathe

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com