12वी बोर्ड परिक्षासंबंधित याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत तहकूब 

12वी बोर्ड परिक्षासंबंधित याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत तहकूब 
supreme court.jpg

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची CBSE  इयत्ता 12वीची बोर्ड परिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या  याचिकेवर Petition  होणारी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. यात पुढील सुनावणी 3 जून 2021 रोजी होईल. बारावी भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र  ICSE आणि CBSE  बोर्डाच्या परीक्षाबाबत दोन दिवसांत केंद्र सरकार निर्णय घेईल, असे  ऍटर्नी जनरल Attorney General  के.के. वेणुगोपाल यानी  सर्वोच्च न्यायालयात  सांगितले आहे. त्याचबरोबर न्यायालयानेदेखील दोन दिवसांत केंद्र सरकारला अंतिम निरमे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तूर्तासतरी 3 जूनपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.  (Hearing on 12th board exam adjourned till June 3) 

सीबीएसईची इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा 2021 च्या परीक्षा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी 31 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान,  केंद्राने दोन दिवसांची मुदत मागितली आहे. अ‍ॅडव्होकेट ममता शर्मा यांनी ही याचिका  दाखल केली आहे.  तर  न्यायमूर्ती ए .एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. ''निर्णय घेण्यास तुम्ही मोकळे आहात. आपण वेळ घ्या,  परंतु मागील वर्षाच्या तुलनेत एखादा  वेगळा निर्णय घेणार  असल्यास त्यामागे  वाजवी कारण असावे. त्यामुळे लवकरात लवकर यावर्षासाठी निर्णय घ्या,  असे न्यायाधीशांनी म्हटले. 

त्यावर अॅटर्नी जनरल यांनी उत्तर दिले.  गेल्या वर्षी लॉकडाउनपूर्वी काही पेपर झाले होते. मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती.  यापूर्वी 28  मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने  याचिकाकर्त्याला सीबीएसई आणि आयसीएसईच्या वकिलांना या याचिकेची प्रत सादर करण्यास सांगितले होते.   

काय  आहे याचिका? 
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की सद्यस्थिती परीक्षा घेणे योग्य नाही, परंतु परीक्षा पुढे ढकलल्यास निकालास उशीर होईल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासावर होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांनी गुण देण्याचा मार्ग शोधला पाहिजे, जेणेकरून निकाल लवकरात लवकर जाहीर करता येईल.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com