मुंबई-पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

मुंबई-पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार  पाऊस

मुंबई: विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या विविध भागांत रात्रभर पाऊस पडत आहे. पहाटे पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. दक्षिण मुंबईसह उपनगरातही सर्वदूर पाऊस कोसळत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने मंगळवारी रात्रीपासूनच पुन्हा हजेरी लावली.


पुण्यातही मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळील रस्ता, एसएनडीटी परिसर, आघारकर रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन, कोथरूड येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. भोसरीतील साईनाथ नगर भागात पाणी शिरले असून तिथे अग्निशमन दल मदतकार्यासाठी दाखल झाले आहे.

पुढील ४ ते ६ तास मुंबई शहर व उपनगरात तसेच पालघर, विरार, मिरा-भाइंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अलिबाग या भागांत पावसाचा जोर कायम राहणार, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे तर पुढील दोन तास प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. पहाटे पावणेसहा वाजता हवामान विभागाने हा अॅलर्ज जारी केला आहे.

WebTittle: Heavy rains with thunderstorms in Mumbai-Pune


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com