आता तरी मृतांच्या वारसांना मदत द्या; महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसची मागणी

आता तरी मृतांच्या वारसांना मदत द्या; महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसची मागणी
St

मुंबई  : कोव्हिड-१९ या आजारामुळे बाधित व मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या वारसाला सर्व प्रकारची तात्काळ मदत देण्यात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांच्याकडे केली आहे.  

कोरोनाचा Corona शिरकाव भारतात झाल्यानंतर देशभरात टाळेबंदी Lockdown लागू करण्यात आली. या टाळेबंदीत बऱ्याचदा शिथिलता, कठोरता गरजेनुसार आणण्यात आली. पण कायम सुरू राहिली ती लाल परी, या महाराष्ट्र राज्याची जीवन वाहिनी असलेली एसटी.  या एसटीला ST चालवणारे कर्मचारी Workers कोरोनात सेवा देऊन कोरोना बाधित झाले आणि त्यात तब्बल २४५ जण मृत्यू Death पावले आहेत. 

हे देखील पहा -

शासनाने Government या मृत कर्मचाऱयांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली, पण केवळ ११ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाच या मदतीचा लाभ झाला आहे. इतर मृत कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या मदतीपासून अद्याप वंचीत आहेत.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात MSRTC कोरोनाने मृत्यूमुखी होणार्‍या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य देण्याबाबतचे परिपत्रक दिनांक १ जून २०२० रोजी प्रसारित करण्यात आले होते. 

या परिपत्रकाच्या अनुषंगाने केवळ ११ कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरल्याची माहिती आहे.  महामंडळातील एकूण २४५ कर्मचारी covid-19 मुळे मृत्यू पावले आणि साधारण आठ हजार पाचशे कर्मचाऱ्यांना कोरोना चा प्रादुर्भाव झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी मृत्यू पावल्यानंतर सुद्धा अत्यंत कमी कर्मचारी हे साहाय्य मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत .

१३ फेब्रुवारी २०२० रोजीचे परिपत्रक प्रसारित करताना त्यामध्ये घालून दिलेल्या जाचक अटीमुळे बहुतांश कर्मचारी सदर साहाय्य मिळण्यास पात्र ठरलेले नाहीत. याशिवाय या परिपत्रकात प्रवाशांशी प्रत्यक्ष संपर्कात येणारे चालक-वाहक, स्थानकावरील काम करणारे वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षारक्षक हे सहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरतील असे नमूद करण्यात आलेले आहे. 

त्यामुळे बहुतांशी मृत कर्मचारी सहाय्य मिळण्यास पात्र ठरले नाहीत. या परीपत्रकात बदल करावा अशी मागणी Demand यापूर्वी  महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसने Maharashtra ST Karmchari Congress पत्राद्वारे केली होती. त्याचा विचार महामंडळाकडून झालेला नाही असे देखील संघटनेचे म्हणणे आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com