अँटिलिया स्फोटक प्रकरणात आलेल्या धमकीमागे अंडरवर्ल्डची मदत..

अँटिलिया  स्फोटक प्रकरणात आलेल्या धमकीमागे अंडरवर्ल्डची मदत..
Antilia Bomb Case

मुंबई : रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या बंगल्यासमोर स्काँर्पिओ कार सापडल्यानंतर देण्यात आलेली धमकी ही अंडरवर्ल्डच्या माध्यमातून पाठवल्याचे  एनआयएच्या (NIA)  तपासात आढळून आले आहे.   जैश उल हिंद (Jaish ul Hind) या दहशतवादी संघटनेच्या नावाने हा संदेश पाठवण्यात आल्याची माहिती  एनआयएला तपासात मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. Dawood Ibrahim aide help taken to send threat to Mukesh Ambani

वसईतील एका हस्तकाच्या मार्फत तिहार जेल मधील अंडरवल्डशी (Underworld) संबधित एका व्यक्तीशी संपर्क साधून हा संदेश पाठवण्यात आला होता, असे एनआयएला दिसून आले आहे. जैश उल हिंद नावाच्या संघटनेने अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवल्याची जबाबदारी सुरुवातीला स्विकारली होती. परंतू, एनआयए ही केस तात्काळ आपल्याकडे घेईल या भितीपोटी पुढील काही तासातच ही जवाबदारी फेटळणारा संदेशही वायरल करण्यात आला. पण त्यानंतर खरोखरच  एनआयएने ही केस ताब्यात घेतल्याने आरोपींचा डाव फसला.

अंडरवर्ल्ड डाॅ दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) एके काळचा विश्वासू असलेला हा गँगस्टर सध्या एका रुग्णालयात दाखल आहे. मध्ये उत्तर प्रदेशातील एका स्थानिक व्यक्तीला २०१९ मध्ये धमकीसाठी फोन केल्या प्रकरणी या गँगस्टर विरोधात तक्रार करण्यात आली आहे.  या गँगस्टरच्या वसईतील (Vasai) हस्तकाच्या मदतीने हा संदेश पाठवण्यात आल्याचे एनआयएच्या तपासात दिसून आले आहे. तसेच मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या हत्येचा तपास भरकटवण्यासाठी त्यांचे शेवटचे लोकेशन वसई दाखवण्यात आले होते. त्यातही या हस्तकाने आरोपीला मदत केली होती किंवा कसे? याबाबतही  एनआयए तपास करत आहे. Dawood Ibrahim aide help taken to send threat to Mukesh Ambani

Edited By - Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com